पोलिसांची कोरोना चाचणी शासकीय खर्चातून; राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्पष्टोक्ती

338

नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या कोरोना चाचणीचा खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

वाठोड पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत असलेला आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे वाठोडा पोलीस ठाण्यातील 32 पोलिसांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी केलेल्या कोरोना चाचणीची रक्कम तात्काळ देण्याचे निर्देश गृहमंत्री देशमुख यांनी दिले. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. ज्या 10 पोलिसांनी कोरोना चाचणी केल्या आहेत. त्या पोलिसांना तात्काळ रक्कम देण्याचे निर्देश दिले आहे. उर्वरित 22 पोलिसांची कोरोना चाचणी शासकीय खर्चातून करण्याचे निर्देश गृहमंत्री देशमुख यांनी दिले आहेत. कोणत्याही पोलिस कर्मचार्याला स्वतःच्या खर्चातून कोरोना चाचणी करावी लागणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या