पळून जाण्यास नकार दिला, प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांचे दुकान जाळले

प्रेयसीने पळून जाण्यास नकार दिल्याने तिच्यावरचा राग प्रियकराने जाळपोळ करुन काढला. प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांचे दुकान जाळले आणि मिनी ट्रक पेटवून दिला. ही घटना नागपूर जिल्हातल्या वाघोडा येथे घडली. आरोपी आणि तरुणी मागच्या सात महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. ही बाब प्रियकराच्या बायकोला कळाली होती, आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत हे कळाल्यामुळे ती घर सोडून गेली होती.

बायको घर सोडून गेल्यानंतर आरोपी प्रेयसीच्या मागे लागला होता की आपण सोबत राहू. आपल्या सोबत पळून जाण्याबाबत त्याने प्रेयसीला अनेकवेळा गळ घातली होती. मात्र तिने दर वेळी नकार दिला होता. बायकोही घर सोडून गेली प्रेयसीही आपल ऐकत नाही यामुळे आरोपी संतापला होता. वारंवार सांगूनही प्रेयसी आपल्या सोबत पळून जाण्यास तयार नसल्याने आरोपीने तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. आरोपीच्या प्रेयसीच्या वडिलांचे फळाचे दुकान आहे. तसेच तिच्या वडिलांचा मिनी ट्रकही आहे या दोन्हीला आरोपीने आग लावली. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.