पैसे नाही म्हणून कामे नाहीत! तुकाराम मुंढेंनी केली भाजपची बोलती बंद

महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. थकलेली बिले द्यायला निधी नाही. 2,121 कोटी रुपयांचे महापालिकेवर दायीत्व आहे. नवीन कामे घेऊन महापालिकेवर आर्थिक बोझा, दायीत्व वाढविणे शक्य नाही. जी कामे थांबलेली आहे, ती केवळ पैसे नाहीत म्हणून थांबविण्यात आली आहे. अशी माहीती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वसाधारण सभेत दिली. यामुळे सत्ताधारी भाजपची बोलती बंद झाली.

आजपर्यंत महापालिकेत जी कामे केली ती पूर्णतः नियमानुसार केली. सभागृहात जी माहिती दिलेली माहिती ही खोटी नाही आणि लबाड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 20 जून रोजी सुरू झालेल्या महासभेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. ते म्हणाले, महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. यापूर्वीच्या सभेतही ही माहिती दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या