कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या घरावर महापालिकेचा बुलडोजर

980

कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या घरावर नागपूर महापालिकेने मंगळवारी बुलडोजर बढवला. अतिक्रमण विरोधी पथकाकडून आंबेकरच्या घराचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. अपराधिक प्रवृत्तीतून मोठी माया जमवलेल्या आंबेकरचा हा आलिशान बंगला अनधिकृतपणे बांधण्यात आला होता. महापालिकेकडून हा बंगला पूर्णत: भुईसपाट करण्यात येणार आहे. कारवाईच्या पहिल्या दिवशी बंगल्याचे पुढील भागाचे बांधकाम पाडण्यात आले. यावेळी, मोठ्याप्रमाणात बघ्यांची गर्दी गोळा झाली होती.

अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी सकाळी 11.30 वाजता पासून अवधूत मंदिर रोड, हमालपुरा येथे राहणारे कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर यांच्या बंगल्याचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास प्रारंभ केला. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला अनधिकृत बांधकाम तोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार, पथकाने कारवाई केली.

आंबेकर याने तीन भुखंडाला जोडून प्लाटला जोडून मोठा बंगला बांधला होता. त्याचा एक प्लॉट नेहा संतोष आंबेकर यांचे नावे होता. बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रकण विरोधी पथकाकडून 2 जेसीबी व 1 पोकले च्या मदतीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त महेश मोरोणे व पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रसंगी लकडगंज पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. लकडगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नरेंद्र हिवरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक चौधरी, महापालिकेचे सहा.आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरिक्षक संजय कांबळे यांच्यासह त्यांची चमू या कारवाईत सहभागी होती.

आपली प्रतिक्रिया द्या