Nagpur News : स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; तीन ठार, सातजण जखमी

नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून स्फोटकं बनवाणाऱ्या कंपनीमध्येच भीषण स्फोट झाला आहे. या भयानक दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच सात जण जखमी असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर घटना नागपूरमधील ठामणा भागातील स्फोटकं बनवणाऱ्या चारमुंडी कंपनीमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत तिघांचा जागीत मृत्यू झाला तर,  तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंपनीमध्ये सात ते आठ जण काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीमध्ये स्फोटके आहेत. त्यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे.