चोराने पोलिस ठाण्यातूनच चोरून नेला जप्त केलेला ट्रक

नागपूर येथे एका चोराने चक्क पोलिसांना आव्हान देत, पोलिस ठाण्यासमोरूनच जप्त केलेल्या ट्रकची चोरी केली. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ए. के. स्टिल कंपनीचा सळाखींनी भरलेला चोरी गेलेला ट्रक गुन्हे शाखा पोलिसांनी वेगाने तपास करीत पकडला होता. यात संजय ढोने नामक चोरालाही अटक केली होती. कारवाई लकडगंज पोलिसांच्या हद्दीत झाल्यामुळे ट्रक आरोपीसह लकडगंज पोलिसांच्या हवाली करण्यात आला. लकडगंज पोलिसांनी चोराला न्यायालयात सादर केले असता तो जमानतीवर सुटला. त्याने लकडगंज पोलिसांना आव्हान देत ठाण्यासमोरूनच ट्रक घेऊन पसार झाला. गृहमंत्री गावात असताना प्रकरण उघडकीस आल्यामुळे लकडगंज पोलिसांची पाचावरण धारण बसली आहे.

ट्रक चोरून नेताना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. या संदर्भात ठाणेदार नरेंद्र हिवरे यांच्याशी संपर्क साधला असता ट्रक ठाण्याच्या परिसराबाहेर जून्या पोलिस ठाण्याच्या बाजूने उभा केला असल्याचे सांगितले. लकडगंज पोलिस ठाण्यासमाेरील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ट्रक बाहेर उभा होता. चोराने सकाळी 5.30 ते 5.45 च्या दरम्यान ट्रक चोरून नेला. जूने ट्रक मोठ्या खिळ्याने सहज सुरू होतात, असे हिवरे यांनी सांगितले. चोराला पकडण्यासाठी वेगवेगळ्या दिशेला टिम पाठवल्याचे हिवरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या