नागपूरच्या युवकाने केला टॅटूचा विक्रम

14

सामना प्रतिनिधी। नागपूर

राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर नवनवीन विक्रम करण्यासाठी प्रसिद्धीझोतात आले आहे. प्रदीप मुलानीने 21 तासांत 444 टॅटू काढण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. यापूर्वी ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये हा विक्राम कॅलिफोर्नियातील एका महिलेच्या नावावर होता. तिने 24 तासांत चारशे टॅटू काढले होते. प्रवीण मुलानीने हा विक्रम करून नागपूरच्या शिरपेचात नवीन तुरा खोवला आहे.

24 तासांत चारशे टॅटू काढण्याचा विक्रम मोडीत काढण्याचा संकल्प प्रदीपने केला होता. याकरिता गुरुवारी त्यांने आपल्या विक्रमाला सुरुवात केली होती. मात्र मध्येच वीज गेल्याने त्याला विक्रमाला गवसणी घालता आली नाही. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या नियमानुसार सर्व विक्रमाचे सलग व्हिडीओ चित्रकरण करणे बंधनकारक असते. त्यात खंड पडल्याने प्रदीपने पुन्हा रविवारपासून आपल्या विक्रमास सुरुवात केली. सोमवारी सकाळी त्याने कॅलिफोर्नियातील महिलेच्या विक्रमालाही मागे टाकले.

आपली प्रतिक्रिया द्या