भाजपसोबतची युती तोडताच नागपूरमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष

18

नागपूर: भाजपसोबतची युती तुटल्यानंतर नागपुरात आज शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करत आतषबाजी केली. शिवसेनेच्या रेशीमबाग कार्यलयासमोर जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्या नेतृत्वात शिवसनेने भाजपसोबत युती तोडल्याचाआनंदोत्सव आतषबाजी करून साजरा केला.

मुंबईमध्ये गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षापासून भाजपसोबत असलेली युती तुटल्याची घोषणा केली.त्यानंतर त्याचे पडसाद नागपुरात दिसून आले. संघमुख्यालयाच्या शेजारी असलेल्या शिवसेना पक्ष कार्यलयासमोर शिवसैनिक सकाळपासूनच जमू लागले. साडेदहाच्या सुमारास उद्धव ठाकरे आगे बढोच्या घोषणा देत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी परिसरात जोरदार आतषबाजी करत नव्या जोमात महापालिका निवडणुकीत उतरण्याचा आपला इरादा स्पष्ट केला. नागपुरात शिवसेनेची फारशी ताकत नसली तरी भाजपला काही ठिकाणी त्यांचे उमेदवारांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या