नदी पात्रात पडलेल्या ‘वाघाचा’ मृत्यू

679

भद्रावती तालुक्यातील माजरी-चारगाव मार्गावर शिरणा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या ढिसाळ आणि अनुभवशून्य प्रयत्नांमुळे या नर वाघाचा हकनाक मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.

शिरणा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला हा वाघ घाबरुन पुलाखाली उतरून पाण्यात बसला. बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा वाघ लोकांना दिसला. तेव्हापासून आज मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तो तसाच पाण्यात होता. त्यानंतर वनविभागाला कळवण्यात आले. मात्र बचावकार्यात कोणतेही नियोजन किंवा सुसूत्रता नव्हती. यामुळे वाघाचा मृत्यू झाला.  पण आम्ही भरपूर प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या