नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले होते. याच दरम्यान तुकाराम मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या