नागपुरात दोन दिवसापुरताच लसींचा साठा, कोव्हॅक्सिनचे डोस संपले

दोन दिवसांपूर्वी मेडिकलमधील 600 कोव्हॅक्सिन लसी महालमधील एका केंद्रात पाठवण्यात आल्या. त्यानंतर नवीन लसींचा पुरवठा मेडिकलला झाला नाही. त्यामुळे बुधवारी मेडिकलमध्ये पहिल्यांदा एकाही नागरिकांना पहिली मात्रा दिली गेली नाही. काहींना दुसरी मात्रा दिल्यावर साठाच संपला आहे.

आज कोव्हॅक्सिनचा साठा संपला आहे कोविशिल्डचा साठा दोन दिवस पुरेल इतका आहे. आज रात्रीपर्यंत साठा येण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील नागपूर जिह्यासह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या सहा जिह्यांसाठी मागील तीन महिन्यांत आतापर्यंत 12 लाख 54 हजार 400 कोविशिल्ड तर 1 लाख 75 हजार 160 कोव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या. मेडिकलचे वैद्याकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले की, मेडिकलच्या केंद्रात साठा अत्यल्प असला तरी आलेल्या सगळ्यांनाच लस दिली गेली. फक्त पहिली मात्रा घेण्यासाठी आलेल्यांना दोन दिवसांनी येण्याची विनंती केली गेली. दरम्यान, पूर्व विदर्भातील सहा जिह्यातील अनेक केंद्रात काही दिवस पुरेल एवढाच साठा असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या