नक्षली कारवायांमध्ये सहभागी प्राध्यापक शोमा सेन अखेर निलंबित 

18

सामना प्रतिनिधी । नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या प्राध्यापक शोमा सेन यांना निलंबित करीत त्यांच्या निवृत्ती लाभासंदभार्तील प्रक्रिया थांबविली आहे. सेन यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी करण्यात येणार असून अहवालानंतर पुढील कारवाइ केली जाणार आहे.

नक्षली कारवायांमधील सहभागी असल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी प्रा. शोमा सेन यांना ताब्यात घेतले होते. प्रा. सेन ह्या विद्यापीठाच्या इंग्रजी विभागामध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत होत्या. प्रा. सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र दबावगट सक्रिय झाल्याने विद्यापीठाने कारवाईला चालढकळ केली. यासंदर्भात अखेर कुलगुरूंनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा. सेन यांना निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर विद्यापीठ वतुर्ळात निरनिराळे मतप्रदर्शन झाले होते. डॉ. सेन यांच्या या कृत्यांसंदर्भात पोलिसांकडून देखील विद्यापीठाला सविस्तर पत्र पाठविण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्याविरोधात चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केल्येची महिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यापीठाची अंतर्गत चौकशी झाल्यावर सेन यांच्याविरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या