नायगाव बीडीडी पुनर्विकास मार्गी

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे. यासाठी भवानी माता मित्र मंडळाने आयोजित केलेल्या तातडीच्या बैठकीत भाडेकरूंनी ‘म्हाडा’शी मध्यस्थी करून लार्सन अँड टुब्रो कंपनीकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

भवानी माता मित्र मंडळाच्या वतीने चर्चा विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून त्यांच्यामुळे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागेल असा विश्वास यावेळी भाडेकरूंनी व्यक्त केला. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, कालीदास कोळंबकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, उर्मिला पांचाळ यांनी रहिवासी-भाडेकरूंसोबत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी अखिल बीडीडी चाळ हक्क भाडेकरू संरक्षण समिती सरचिटणीस किरन माने, सल्लागार दत्ता दिवेकर, भाई कांबळे, गजेंद्र धुमाळे, प्रशांत घाडीगावकर, बाळकृष्ण लोके, राजेंद्र सोनावणे, कृष्णकांत नलंगे, निळकंठ केसरकर, नितीन कदम आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या