सौंदर्याच्या दहा दिशा

86

सौंदर्यसाधनेतून करीयरनेल आर्टएक देखणी कला.

सौंदर्य वाढविण्याचे प्रत्येक साधन रचनात्मकता आणि कल्पकतेशी जोडलं गेलंय… वेगवेगळ्या पद्धतीच्या केशरचना असो किंवा कपाळावर लावण्यात येणाऱया विविध आकारातील टिकल्या किंवा ‘नेल आर्ट’मधील चमचमणारे स्टार्स… शरीराच्या प्रत्येक भागाला सौंदर्याचा स्पर्श व्हावा यासाठी स्त्र्ाया अत्यंत जागरूक असतात. मग नखासारखा अतिशय लहान भाग का असेना. नखे सुंदर दिसण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजविले जाते.

सौंदर्यातही तंत्रज्ञान आलंय… पण हे न करताही आपण स्वतःच्या कल्पनाशक्तीने नखे सजवू शकतो. नखांना छिद्र पाडून त्यात आपण रिंगही घालू शकतो तसेच आवडत असल्यास प्रत्येक नख वेगवेगळ्या तऱहेने रंगवू शकतो. आज बाजारात कृत्रिम नखेसुद्धा मिळतात. यामुळे आपण नखे वाढविण्याच्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. आपण आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपल्या नखांकडे दुर्लक्ष करतो.

नखं सजवणं ही एक कला आहे. तुम्हाला नेल आर्टची आवड असेल तर यामध्येही करीयर करण्याची संधी उपलब्ध आहे. नखांवर रंगवण्यात येणारी विविध प्रकारची नक्षी, थोडक्यात नखांच डिझायनिंग कसं करायचं, ते या कोर्समध्ये शिकायला मिळतं. तसेच हल्ली 3 डी नेलआर्ट ही कलाही जास्त लोकप्रिय होत आहे. याकरिता ऍक्रेलिकचा वापर केला जातो. नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही पद्धतीने ती वापरता येते.

आवश्यक गुण

कलात्मक दृष्टी असलेल्यांना या क्षेत्रात खूप संधी आहेत. स्वतःतील क्रिएटिव्हिटीचा संपूर्ण वापर येथे केला जातो. बदलत्या ट्रेंडनुसार नखांवर अनेक प्रकारचे नक्षीकाम करण्याची संधी मिळते. सुंदरतेच्या नवनवीन कल्पना नखांवर साकारण्याची संधी मिळते. हिरवा, निळा, जांभळा, काळा, केशरी अशा विविध कॉण्ट्रास्ट रंगांच्या डिझाईन केल्यामुळे नखांच्या सौंदर्यात  विविध प्रयोग करण्यासाठी सतत कल्पकता जागरुक ठेवण्याची या क्षेत्रात करीयर करणाऱया व्यक्तीला आवश्यकता असते.

शिकण्याविषयी

१५ दिवस, १ महिना आणि २ महिन्यांचाही कोर्स करता येतो.

या कलेचे वैशिष्टय़ असे की, सुशिक्षितांसह अशिक्षित व्यक्तीही नेल आर्ट शिकू शकते.

यामध्ये बेसिक, अल्ट्रा आणि डिप्लोमा कोर्सचाही समावेश आहे.

हातांच्या नखांबरोबर पायांच्या नखांचे सौंदर्यही कसे जपावे हेही शिकवले जाते.

हात-पायांच्या नखांचे आरोग्य कसे जपावे याविषयी माहिती दिली जाते.

कुठे शिकाल?

इंटरनॅशनल नेल आर्ट इन्स्टिटय़ुट, लखनऊ

नेल आर्ट अकादमी, ऍडव्हान्स हेअर स्टुडियोच्या समोर, मुंबई – 400050

कविज् नेल केअर ऍण्ड इन्टिय़टय़ुट टेलॉजी, पूजा अपार्टमेंट, एसव्ही रोड, खार (प.), मुंबई-400052

नेल आर्ट अकादमी, शॉप 18, पहिला मजला, सनराईज शॉपिंग कॉम्प्लेक्स, घोडबंदर रोड, ठाणे.

बऱयाचशा मान्यताप्राप्त ब्युटी पार्लरमध्ये नखांचे डिझाइन कसे करावे याविषयीचे डिप्लोमा आणि बेसिक कोर्सेस शिकवले जातात.

गरज काय ?

कृत्रिम नखांच्या वापरामुळे बरेच फायदे होतात. कारण ही नखे आवश्यकतेनुसार आपल्याला काढूनही ठेवता येतात. तसेच नैसर्गिक नखांवर तयार केलेली विविध प्रकारची नक्षी सौंदर्यात भर घालते, असे नखतज्ञांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या