नायर रुग्णालयात दोन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण

635

मुंबई येथील नायर रुग्णालयात दोन निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचं वृत्त आहे. या मारहाणीविरोधात नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी अधिक सुरक्षेची मागणी केली आहे.

शनिवारी सकाळी नायर रुग्णालयात दाखल असलेल्या एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी दोन निवासी डॉक्टरांना मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयाचा ओपीडी विभाग बंद करून डॉक्टरांनी या कृत्याचा निषेध केला.

महाराष्ट्र निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या घटनेचा निषेध केला असून डॉक्टरांसाठी अधिक प्रमाणात सुरक्षेची मागणी केली आहे. अधिकची सुरक्षा पुरवल्यानंतरच डॉक्टर कर्तव्यावर रुजू होतील, असंही संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या