नायर रुग्णालयाला ‘सार्थ’ मदत, महेश बोभाटे स्मृतिदिनानिमित्त रुग्णबेडचे वाटप

समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्दात व सामाजिक भावनेने सार्थ प्रतिष्ठानतर्फे नायर रुग्णालयाला मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिष्ठानतर्फे रुग्णालयास रुग्णबेडचे वाटप करण्यात आले आहे. शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय महेश बोभाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमास रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल, डॉ. सारिका पाटील, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, बाळाशेठ  खोपडे, अण्णा पारकर, दिनेश बोभाटे, मिनेश बोभाटे, प्रथमेश बोभाटे, उमेश नाईक, वामन भोसले, विलास जाधव, श्रीराम विश्वासराव, शाखाप्रमुख राजेश कोकम, सिद्धेश मांडगावकर, ललित अत्तावर, अनिल शेकोकर, मंगेश कदम, राजेश वराडकर, श्रीराम रावराणे, राजू पांजरी, राजेंद्र राणे, सुजित राणे, आल्हाद नाईक, अजय पथरोड, अमोल मटकर, अनिल पांचाळ, नितीन शिरोडकर, अमोल कदम, संभाजी शिंदे, धनाजी साळुंखे, मनोज वारंग, अनिल पांचाळ, सिद्धेश पाटील, संदीप हिंदलेकर, स्वप्नील पांगळे, प्रदीप मोरे, महेश पेडणेकर, मिलिंद नागझरकर, अविनाश शिवगण, ऋतिक चव्हाण, विजय डिचवलकर, जय हडकर, सचिन शिशुपाल, राजा केरेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सार्थ प्रतिष्ठानचे काwतुक केले व अशीच कायम मदतीची भावना ठेवून रुग्णालयास सहाय्य करत रहाल व अशा उपक्रमामुळे सहाय्य करण्याची भावना आपल्यासारख्या संस्थेमुळेच वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. या आधी सार्थ प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय महेश बोभाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केईएम  रुग्णालयास व्हीलचेअर वाटप, अनाथाश्रमामधील लहान मुलास औषध व अन्नदान, आरोग्य शिबीर, गरीब व गरजू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या