संतप्त चाकरमान्यांचा नालासोपाऱ्यात रेल रोको, पाऊण तास लोकल रोखून धरली

एसटीने जाण्याची परवानगी नाही आणि लोकलमध्ये प्रवेश नाही अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या नालासोपाऱ्यातील चाकरमान्यांच्या संतापाचा आज स्फोट झाला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही लोकलने प्रवास करू द्या, आमच्या नोकऱ्या वाचवा अशा घोषणा देत खासगी कंपन्या आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून रुळावर धाव घेतली आणि रेल रोको केले. तब्बल पाऊण तास सुरू असलेल्या या आंदोलनाने प्रचंड गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला आणि त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेली लोकलसेवा पूर्ववत झाली.सकाळी शेकडो चाकरमानी नालासोपारा एसटी स्टॅण्डमध्ये पोहचले. त्यांनी मुंबईसाठी बस सोडण्याची मागणी केली. त्याला डेपो मॅनेजरने नकार दिल्यानंतर या प्रवाशांचा संयम सुटला. सकाळी सवा अकराच्या दरम्यान एसटी स्टॅण्डवरचा जमाव रेल्वे स्थानकात घुसला.

आपली प्रतिक्रिया द्या