मुलाला खेळणं आणायला गेलेल्या महिलेची हत्या, मृतदेहावर केला बलात्कार

3206
प्रातिनिधिक फोटो

मुलाला खेळणं आणायला गेलेल्या एका महिलेची दुकानदाराने हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 जून रोजी नालासोपाऱ्यात हा भयंकर प्रकार घडला असून महिलेचा मृतदेह 28 जून रोजी सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या दुकानदाराला अटक केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील चंदन नाका येथे राहणारी पीडित महिला सामान आणायला गेली होती. त्यावेळी मुलाला खेळणं घेण्यासाठी ती एका नोव्हेल्टी दुकानात गेली. त्यावेळी त्या दुकानदारासोबत तिचे भांडण झाले. त्यानंतर ती महिला तेथून निघून जात असताना दुकानदाराने तिचे केस ओढले व तिला खेचत दुकानाच्या आत असलेल्या खोलीत घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. महिला मेल्याचे समजताच त्याने तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. ती रात्र त्याने त्या महिलेच्या मृतदेहासोबतच काढली. पहाटेच्या सुमारास त्याने तिचा मृतदेह गोणीत भरून एका पार्क केलेल्या व्हॅनच्या जवळ नेऊन फेकला.

सदर महिला सामान घेऊन परत न आल्याने तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दोन दिवसांनी महिलेचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एका फुटेजमध्ये महिला एका दुकानात गेल्याचे दिसले मात्र त्या दुकानातून ती महिला पुन्हा बाहेर पडली नाही. या प्रकरणी पोलिसांनी त्या दुकानादाराला ताब्यात घेतल्या नंतर त्याने गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या