‘नाम शबाना’ चित्रपटावर पाकिस्तानात बंदी

35

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अक्षय कुमार आणि तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेला ‘नाम शबाना’ नावाचा चित्रपट हिंदुस्थानात मोठ्या झोकात प्रदर्शित झाला आहे. मात्र पाकिस्तानात हा चित्रपट दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यात आला होता, मात्र प्रदर्शनानंतर अधिकाऱ्यांनी चित्रपटामुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचं कारण देत चित्रपटावर बंदी घातली आहे.

याआधीही हिंदुस्थानच्या अनेक चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. यात अमिर खानचा ‘दंगल’, सोन कपूरचा ‘नीरजा’ या गाजलेल्या चित्रपटांचाही समावेश आहे. ‘नाम शबाना’ चित्रपटात तापसीनं एका एजंटच्या भूमिका केली आहे. अक्षय कुमार आणि तापसीसोबत या चित्रपटात मनोज वाजपेयी आणि दक्षिणेकडील कलाकार पृथ्वीराजनं महत्त्वाची भूमिका केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या