‘या’ रेल्वे स्थानकाचे नाव एवढे मोठे की, वाचताना भल्याभल्यांचे डोके चक्रावेल

देशभरात श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मग तो प्रवास लांब पल्ल्याचा असो की, कमी पल्ल्याचा. रेल्वेने प्रवास करणे खूप सोयीचे मानले जाते. याकरिता प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडूनही अनेक पावले उचलण्यात येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांसाठी तिकीट काढण्याची प्रक्रियाही रेल्वेने अतिशय सुलभ केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ब्रिटिश काळापासून सुरुवात झालेल्या रेल्वे प्रवासाला मोठा इतिहास लाभला आहे. यात सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आहेत, ती म्हणजे रेल्वे स्थानकांना दिलेली नावे. देशात असे एक रेल्वे स्थानक आहे, ज्याचे नाव वाचताना  वाचताना वाचकांची, प्रवाशांची तारांबळ उडेलच, पण या नावात काही ना काहीतरी इतिहास दडलेला आहे, हे मात्र नक्की.

देशातील अनेक रेल्वे स्थानकांची नावे अगदी खास आहेत. यातील अनेक रेल्वे स्थानकांची नावे मजेदार आहेत. देशभरातील रेल्वे स्थानकांपैकी कोणत्या रेल्वे स्थानकाचे नाव सर्वात मोठे आहे, हे तुम्हाला माहीत का ? असं एक रेल्वे स्थानक आहे, ज्याचं नाव खूपच मोठं आहे.

आंध्र प्रदेशमध्ये हे रेल्वे स्थानक आहे. जे देशातील सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकाचे स्पेलिंग असे आहे की, भल्याभल्यांचे डोके चक्रावून जाईल. मुख्य म्हणजे या स्थानकाच्या नावात इतकी अक्षरे आहेत, जी वर्णमालेतही नाहीत.

देशातील सर्वात मोठ्या असलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव Venkatanarasimharajuvaripeta (वेंकटनरसिंहराजूवरीपेटा) असे आहे. या स्थानकाच्या स्पेलिंगमध्ये एकूण 28 इंग्रजी अक्षरे आहेत. हे स्थानक आंध्र प्रदेशात आहे, जे तामिळनाडू सीमेच्या अगदी जवळ आहे.