Me Too प्रकरणानंतर नाना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार, ‘रॉ’ प्रमुखांची भूमिका साकारणार

1336
विश्वनाथ पाटेकर हे त्यांचे संपूर्ण नाव. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

Me Too प्रकरणानंतर अभिनेते नाना पाटेकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. चित्रपट प्रोड्युसर फिरोज नाडियादवाला यांच्या आगामी चित्रपटात आणि वेब सिरीजमध्ये नाना पाटेकर यांनी घेण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर संस्था (रॉ) चे संस्थापक आणि पहिले प्रमुख रामेश्वर काव यांच्या आयुष्यावर फिरोज नाडियादवाला चित्रपट आणि वेब सिरीज आणत आहेत. यात नाना पाटेकर रामेश्वर काव भूमिकेत दिसणार आहेत.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सेटवर नाना यांनी आपल्यासोबत गैरप्रकार केल्याचा आरोप करत तिने पोलिसात धाव घेतली होती. याचा प्रभाव नाना यांच्या चित्रपट कारकिर्दीवर पडला आणि ‘हाऊसफुल -4’ या चित्रपटातून त्यांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र आता ते पुन्हा पुनरागमन करणार आहेत.

वेबसिरीजमध्ये 20 एपिसोड
फिरोज यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टबाबत बोलताना सांगितले की, आम्ही यावर 5 वर्षांपासून काम करत असून काव यांच्या आयुष्यावर आधारित वेबसिरीजमध्ये 20 एपिसोड असणार आहेत. यानंतर यावर चित्रपटही काढण्यात येणार आहे. यातील जवळपास सर्व कलाकारांची निवड करण्यात आली असून चित्रपट आणि वेबसिरीज दोन्हीकडे सारखेच कलाकार असणार आहेत. या वर्षी नोव्हेंबरपासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या