भन्साळी सॉफ्ट टार्गेट वैगेरे काही नाही; नानाची जळजळीत प्रतिक्रिया

36

सामना प्रतिनिधी । गोवा

पद्मावती सिनेमाचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची प्रदर्शानाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे. या वादात आता अभिनेते नाना पाटेकर यांनी उडी घेतली आहे. पद्मावती सिनेमाबाबत बोलताना नानांनी संजय लीला भन्साळींवर जळजळीत टीका केली आहे. नाना म्हणाले की, ‘भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे, त्यांचा ‘बाजीराव मस्तानी’ बाकीच्यांना आवडला असेल, पण मला नाही.’

गोव्यात सुरु असलेल्या ‘इफ्फी’ सोहळ्यात नाना बोलत होते. ‘कुणी उगाच कुणाला टार्गेट करत नाही. कलाकार आणि दिग्दर्शकाची स्वत:ची एक जबाबदारी असते, ती ओळखून काम करायला हवे. तसेच आपण कुणाला आयुष्य देऊ शकत नाही, मग कुणाचा जीव घेण्याचा अधिकारही आपल्याला नाही. त्यामुळे ‘पद्मावती’ सिनेमाच्या विरोधासाठी नाक, डोळे कापण्याची भाषा योग्य नाही’ असंही नाना म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या