पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना दिलासा द्या; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटीक्ह बँकेच्या नऊ लाख खातेदारांना दिलासा देण्यासाठी येस बँकेप्रमाणेच प्रस्ताव तयार करावा. बँकेवर नेमण्यात आलेले प्रशासक, आर्बिट्रेटर आणि आरबीआय यांनी तातडीने पावले उचलत मालमत्ता विक्रीतून निधी उभारण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदार, खातेदारांच्या समस्यांबाबत विधानभवनात नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आरबीआयने 9 लाख ठेवीदार, खातेदारांचे हित डोळ्यासमोर ठेवत येस बँकेच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करावा. आयुष्यभराची पुंजी बँकेत ठेवली, बँक बुडाल्याने मानसिक धक्का बसून तसेच खचून काहींचा मृत्यू झाला आहे. ठेवीदारांच्या हितासाठी आरबीआय काय कार्यवाही करीत आहे, त्यासंदर्भात दर 15 दिवसांनी सद्यःस्थितीचा अहवाल वेबसाईटवर प्रदर्शित केला जावा. त्याद्वारे ठेवीदारांना माहिती उपलब्ध व्हावी अशी सूचनाही नाना पटोले यांनी केली.

यावेळी माजी विधान परिषद सदस्य चरणसिंह सप्रा, मुख्य सचिव संजय कुमार, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ल, अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, सहआयुक्त अनिल कवडे,रिझर्क्ह बँक ऑफ इंडियाचे अभिनक पुष्प, सीए विजय मुंगळे, ठेवीदार संघर्ष कृती समितीचे निखिल व्होरा, सिद्धेश पांडे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या