देवेंद्र फडणवीस यांनी घाबरायचे कारण नाही! नाना पटोलेंचा सल्ला

‘आमचे मित्र देवेंद्र फडणवीस निर्दोष असतील तर त्यांनी घाबरायचे कारण नाही’, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिला. देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केलेल्या आरोपांवर बोलताना पटोले यांनी त्यांना टोला लगावत सल्ला दिला.

एबीपी माझाशी संवाद साधताना नाना पटोले यांनी या आरोपावर उत्तर दिलं. ‘देवेंद्र फडणवीस हे स्वत: वकील आहेत. त्यांना कायदेशीर सर्व बाबी माहित आहेत. त्यांनी राजकीय वातावरण न तापवता जे काही मुद्दे आहेत त्याला सामोरं जावं आणि आमचा मित्र निर्दोष असेल तर त्याला काहीच होणार नाही.’, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना, एक खळबळजनक दावा केला. ‘जाणीवपूर्वक कुणीतरी आधीची प्रश्नावली बदलून या व्यक्तीला गुंतवता येते का? आरोपी-सहआरोपी करता येतं का? अशा प्रकारचे प्रश्न होते’, असा आरोप त्यांनी केला.