गुजरातचा विजय लोकशाहीची हत्या करून मिळवला आहे, नाना पटोलेंची भाजपवर टीका

केंद्रात असलेली सत्ता आणि तपास यंत्रणेच्या जोरावर गैरमार्गाने सत्ता मिळवायची असे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे गुजरातचा विजय भाजपने लोकशाहीची हत्या करून मिळवला आहे, अशी टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.

गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपला ही सत्ता मिळाली आहे. भाजपकडून देशभर विजय साजरा केला अजत असतांना नाना पटोले यांनी मात्र या निकालावरून भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपला विजयाच्या शुभेच्छा देत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे नेते जाऊन देखील काहीही फरक पडला नाही, तिथे कोंग्रेसचीच सत्ता आली. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला जो कौल दिला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, परंतु भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मिळवलेली ही सत्ता आहे असा पटोले यांनी केला आहे.