नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, ‘कोरोना’वर मात केलेल्या रुग्णाचे यकृत प्रत्यारोपण

यकृत अगदी शेवटच्या टप्प्यात निकामी झालेल्या तसेच कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका 22 वर्षीय तरुणावर नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हिंदुस्थानातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.

मुंबईत राहणाऱ्या रोशन गुरवला गेल्या 17 वर्षांपासून यकृताचा तीव्र स्वरूपाचा आजार होता. त्याला त्याच्या आईने तिच्या निरोगी यकृतापैकी 50 टक्के भाग दान केला आणि रोशनला नवीन आयुष्य मिळाले. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय ठरावी अशी ही शस्त्रक्रिया ‘एचपीबी सर्जरी व यकृत प्रत्यारोपण’ या विभागाचे प्रमुख व वरिष्ठ सल्लागार डॉ. अंकुर गर्ग यांनी व त्यांच्या पथकाने केली. या शस्त्रक्रियेचे तपशील एका नामांकित वैद्यकीय नियतकालिकात लवकरच प्रसिद्ध होणार आहेत.

‘सुदैवाने रोशनच्या आईचे यकृत त्याच्या शरीराला जुळणारे निघाले. तिच्या यकृताचा काही भाग दान करणे वैद्यकीयदृष्टय़ा शक्य होते,’ असे डॉ. गर्ग यांनी सांगितले.

तथापि, प्रत्यारोपणापूर्वीच्या तपासणीदरम्यान रोशनला ‘कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला. अवयव प्रत्यारोपणाच्या ‘प्रोटोकॉल’नुसार शस्त्रक्रिया सहा आठवडे लांबकिण्यात आली. दोन तीव्र स्वरूपाचे आजार एकत्र असतानाही तो आठवडाभरात बरा झाला, अशी माहिती ‘एचआयपीबी सर्जरी’ व यकृत प्रत्यारोपण सल्लागार डॉ. वैभव कुमार दिली. या यशस्वी कामगिरीबद्दल’ नानावटी हॉस्पिटल’च्या व्यवस्थापकीय संचालिका वंदना पावळे यांनी यकृत प्रत्यारोपण करणाऱ्या चमूचे अभिनंदन केले.

आपली प्रतिक्रिया द्या