नांदेड ते मुंबई विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू

23

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड ते मुंबई विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, पहिल्या विमान प्रवासात मुंबईचे अभिनय क्षेत्रातील जवळपास १६ ते १८ दिग्गज अभिनेते सचखंड श्री हजूर साहिबच्या दर्शनासाठी येणार आहेत.

गुरुव्दारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी मुंबई ते नांदेड पहिल्या विमानाचे उड्डान होणार आहे. या पहिल्या विमान प्रवासात सिने क्षेत्रातील जितेंद्र कपूर व त्यांची पत्नी शोभा कपूर, राकेश रोशन व त्यांची पत्नी प्रमिला, आदित्य पांचोली, झरीना वाहब, मुकेश ऋषी, राघव ऋषी, जऐश शहा, शक्ती कपूर, अरमान कोहली, गुलशहन गोर, अनु राजन, रमेश आरोरा, अरुण पंडीत यांच्यासह जवळपास २० जणांची येण्याजाण्याची टिकीटे आरक्षित करण्यात आली आहेत. गुरुव्दारा बोर्डाचे अधीक्षक थानसिंघ यांनी ही माहिती दिली आहे. हे सर्वजण सचखंड श्री हजूर साहिब येथे दर्शनासाठी येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या