सहजीवनी या… : जीवनात ही घडी अशीच राहू दे!

2826

>>  नंदिनी चपळगावकर

 • आपला जोडीदार : निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर
 • लग्नाचा वाढदिवस : 3 जून 1968
 • आठवणीतला क्षण : जेव्हा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली तो क्षण माझ्यासाठी आठवणीतला क्षण आहे.
 • त्यांचे दोन शब्दांत कौतुक : माझ्यासाठी ते सुसंस्कृत आणि प्रेमळ पती आहेत.
 • त्यांचा आवडता पदार्थ : माझ्या हातचा कुठलाही पदार्थ त्यांना आवडतो.
 • एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ : ते दहीभात खूप छान करतात
 • वैतागतात तेव्हा : काही न बोलता गप्प बसून राहते.
 • त्यांच्यातली कला : ते उत्तम लेखक आहेत आणि चांगले वक्ते आहेत.
 • त्यांच्यासाठी गाण्याची ओळ : जीवनात ही घडी अशीच राहू दे…
 • तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान : माझ्या आयुष्यात ते हिमालयाची सावली आहेत.
 • भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल : आमच्या मुलांचं बालपण. भूतकाळातले ते दिवस जगायला आवडतील.
 • तुमच्यातील सारखेपणा : आम्हाला दोघांनाही शास्त्रीय संगीत खूप आवडते.
 • कठीण प्रसंगात त्यांची साथ : कठीण प्रसंगात ते असतात म्हणून तो प्रसंग कठीण वाटत नाही आणि कधी वाटलाच नाही.
 • आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट : आम्ही दोघेही अतिशय सुरेख सुंदर आयुष्य जगतो आहोत. असेच आयुष्य एकमेकांसोबत शेवटपर्यंत जगूदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपली प्रतिक्रिया द्या