संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे नंदकुमार घोडेले महापौर

43

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

संभाजीनगर महानगरपालिकेत झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नंदकुमार घोडेले ७७ मते मिळवून विजयी झाले. घोडेले यांनी ‘एमआयएम’चे अब्दुल नाईकवाडे यांचा पराभव केला. अब्दुल नाईकवाडे यांना २५ मते मिळाली तर काँग्रेस पक्षाच्या अय्युब खान यांना ११ मते मिळाली. ११३ नगरसेवकांनी मतदान केले.

संभाजीनगरचे २२वे महापौर म्हणून नंदकुमार घोडेले विराजमान झाले. सभागृहात शिवसेना-भाजप युतीचे ५१ सदस्य असून २० अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे.

शिवसेना-भाजपमधील करारानुसार महापौरपदाच्या निवडणुकीत युतीच्यावतीने शिवसेनेने उमेदवार उभा केला होता. नंदकुमार घोडेले पुढील अडीच वर्षांसाठी संभाजीनगरचे महापौर असतील. उपमहापौरपदासाठी युतीच्यावतीने भाजपचे विजय औताडे उभे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या