‘परी हूँ मैं’मध्ये देविका दफ्तरदार आणि नंदू माधव

8

सामना ऑनलाईन, मुंबई
सशक्त आशय असणारे सिनेमे आता मराठी चित्रपटसृष्टीतही निर्माण होत आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयासक्त पॅशनेबल प्रवास ‘परी हू मै’  या चित्रपटात मांडण्यात आला आहे. अभिनेता नंदू माधव आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार हे पहिल्यांदाच या चित्रपटात नवरा-बायकोच्या रूपाने प्रेक्षकांसमोर एकत्र येत आहेत.

कौटुंबिक नाट्य असणाऱया या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. डॉ. राजेंद्र प्रताप सिंह या चित्रपटाचे निर्माते असून रोहित शिलवंत दिग्दर्शक आहेत. चित्रपटातील आमची केमिस्ट्रि प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास या दोघांनीही व्यक्त केला आहे. योगायतन समुहाने या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची असून  संगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या