नंदू माधव-देविका दफ्तरदार प्रथमच एकत्र

73

विविध भूमिकांमध्ये आपला ठसा उमटवणारे अभिनेते नंदू माधव आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार प्रथमच एकत्र काम करणार आहेत. योगायतन फिल्मस् प्रस्तुत ‘परीहूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटात हे दोघे एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत. योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला सिंह ‘परीहूँ मैं’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘परीहूँ मैं’ हा चित्रपट टीव्ही मालिका, रियालिटी शो अशा चंदेरी दुनियेतील बालकलाकारांभोवती फिरणारा आहे. या चित्रपटामध्ये नंदू माधव प्रेमळ वडिलांच्या तर देविका शिस्तप्रिय आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर बालकलाकार श्रुती निगडे त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आणि अभिनेत्री फ्लोरा सैनी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 7 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या