ओसाकाचा सेरेनाला पुन्हा जोरदार धक्का

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क
 यंदा मार्च महिन्यात मियामी ओपन टेनिस स्पर्धेत टॉपची टेनिसतारका  सेरेना विलियम्सला पराभवाचा झटका देणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाने तसाच पराक्रम पुन्हा केला आहे. अव्वल मानांकित सेरेनाला ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकन तारका सेरेनाला  ६-२,६-४ असे सहज पराभूत करीत आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. या लढतीला लागलेल्या वादाच्या गालबोटाने सेरेना आणि ओसाका या दोघीनींही खंत व्यक्त केली.
नाओमीने आघाडीची टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा ६-२, ६-४ असा सहज पराभव केला. ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावणारी नाओमी ओसाका ( २०) ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरीत नाओमीने अमेरिकेच्या मार्गारेटचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली होती. न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियममध्ये रंगलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सेरेनाला ओसाकाने दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला. याआधी तिनं मार्च महिन्यात झालेल्या ‘मियामी ओपन’ स्पर्धेत तिच्यावर मात केली होती.
अखेरच्या सेटला वादाचे गालबोट 
सेरेना विल्यम्सची कारकिर्दीतील ‘यूएस ओपन’मधील नववी आणि ग्रँड स्लॅममधील ३१ वी फायनल होती. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक २४ विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी सेरेनाला होती मात्र तिला यात यश आले नाही.अखेरच्या सेटमध्ये अमेरिकन कोच पॅट्रिक मोरॅटोग्लू यांनी लढत सुरु असताना सेरेनाकडे पाहून इशारा करीत काही सूचना दिल्याचा दावा करण्यात आला. यामुळे सगळाच गेमच फिरला. यामुळे सेरेना अतिशय दुःखी आणि निराश झाली.आपण खेळात कधीच फसवेगिरी करीत नाही असे सेरेनाला लढत संपल्यावर अश्रुपूर्ण डोळ्यांनी जाहीर करावे लागले. महिला विजेत्या ओसाकानेही महान सेरेनावर अशी वेळ आल्याबद्दल आपल्याला दुःख झाल्याचे सांगितले.
होय ,मी लढत सुरु असताना अनवधानाने सेरेनाला खुणा करून काही सूचना देत होतो. पण तिने माझ्याकडे एकदाही पहिले असेल असे मला मुळीच वाटत नाही , अशी प्रतिक्रीया अमेरिकन टेनिस प्रशिक्षक पॅट्रिक मोरॅटोग्लू यांनी दिली आहे,
माझा माझ्या खेळावर आणि कतृत्वावर पूर्ण विश्वास आहे .त्यामुळे जिंकण्यासाठी फसवेगिरी करणे माझ्या रक्तात नाही. चेअर पंच रामोस यांनी माझ्यावर जो फसवेगिरीचा ठपका ठेवला आणि गेम ओसाकाला बहाल केला त्यामुळे मी अतिशय दुःखी झाले आहे ,असे सांगताना सेरेनाला आपल्या अश्रूंचा बांध रोखता आला नाही. मी चीटर मुळीच नाही. उलट महिला टेनिसपटूंना न्याय मिळावा आणि समानतेची वागणूक मिळावी म्हणून मी लढते. माझे माजी पंच मोरॅटोग्लू यांनी मला हाताने खुणा करीत काही सूचना केल्या असा आरोप ठेवून पंच रामोस यांनी माझ्याविरुद्ध गेम प्रतिस्पर्धी खेळाडूला बहाल केला.हीच पुरुषांची लढत असती तर पंचांनी  निर्णय वेगळाच दिला असता, अशी प्रतिक्रिया सेरेनाने व्यक्त केली.
मला माहित आहे की जेतेपद मी पटकावले असले तरी बहुतांश टेनिस शौकीन महान सेरेनाला चीअर करण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करीत आहेत. सेरेनासारख्या ग्रेट खेळाडूशी खेळण्याची माझी मनोकामना पूर्ण झाली .पण या लढतीला वादाचे गालबोट लागले त्याचेच दुःख होतेय असे अमेरिकन ओपन विजेती  नाओमी ओसाका हीने म्हटले आहे.
summary-naomi osaka claims us open title after serena williams meltdown