इंग्लंडच्या तिजोरीच्या चाव्या हिंदुस्थानीकडे, नारायणमूर्तींचे जावई बनले अर्थमंत्री

903
rishi-sunak-uk

इंग्लंडच्या तिजोरीच्या चाव्या हिंदुस्थानी व्यक्तीच्या हाती आल्या आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी हिंदुस्थानी वंशाचे खासदार ऋषी सुनक यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती केली. सुनक हे इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई आहेत.

मूळ पाकिस्तानी असलेले साजीद जावेद यांनी चॅन्सलरपदाचा राजीनामा दिला होता. त्या पदावर हिंदुस्थानी वंशाच्या गृह सचिव प्रीती पटेल यांची नियुक्ती झाली आहे. इंग्लंडमधील महत्त्वाच्या दोन पदांवर एकाच वेळी हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तींची नेमणूक होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

आपली प्रतिक्रिया द्या