बाळासाहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री शहा यांची आदरांजली

489

94 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली अर्पण केली. ट्विटरच्या माध्यमातून मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे अद्यापही लाखो लोकांना प्रेरणा देत असल्याचे म्हटले आहे.

धैर्यवान आणि दुर्दम्य साहस असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांच्या हितासाठी एखादा मुद्दा उपस्थित करताना कधीही संकोच केला नाही. त्यांना नेहमीच हिंदुस्थानची नीती आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते अद्यापही लाखो जणांना प्रेरणा देत आहेत, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या काळातले बुद्धिजीकी होते. त्यांच्या भाषणांनी नेहमीच जनतेला प्रभावित केले. त्यांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही. त्यांचे जीवन आणि मूल्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत गृहमंत्री अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या