मोदी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, निर्मला सीतारमण नव्या संरक्षणमंत्री

19
निर्मला सीतारमण (राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती)

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. ३ वर्षाच्या कार्यकाळातील हा मोदी सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार आहे. ज्यामध्ये ९ नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला तर ४ राज्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली आहे. मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करत निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाच्या संरक्षण मंत्रालयाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत

मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झालेले मंत्री

कैबिनेट मंत्री
१. धर्मेंद्र प्रधान- कौशल्य विकास व पेट्रोलियम मंत्रालय
२. पीयूष गोयल- रेल्वे मंत्रालय
३. निर्मला सीतारमण- संरक्षणमंत्री
४. मुख्तार अब्बास नकवी- अल्पसंख्याक मंत्रालय
५. सुरेश प्रभु- वाणिज्य मंत्रालय
६. स्मृति ईरानी- माहिती आणि प्रसारण मंत्रालय
७. नितिन गडकरी- रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार
८. उमा भारती- पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय

राज्यमंत्री
१. शिव प्रताप शुक्ला – वित्त राज्यमंत्री
२. अश्विनी कुमार चौबे- स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
३. वीरेंद्र कुमार- महिला आणि बालविकास राज्यमंत्री
४. अनंत कुमार हेगड़े- कौशल्य विकास राज्यमंत्री
५. राजकुमार सिंह- ऊर्जा मंत्रालय (स्वतंत्र पदभार)
६. हरदीप सिंह पुरी- नगरविकास राज्यमंत्री
७. गजेंद्र सिंह शेखावत- कृषी राज्यमंत्री
८. सत्यपाल सिंह- शिक्षण राज्यमंत्री
९. अल्फ़ोंस कन्ननथनम- पर्यटन मंत्रालय (स्वतंत्र पदभार)

आपली प्रतिक्रिया द्या