नरेश गोयल यांना आयकरचे समन्स, 650 कोटी रुपयांच्या कर चोरीचा संशय

54

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

जेट एअरलाइन्सचे संस्थापक नरेश गोयल यांना आयकर विभागाने कथित कर चोरीच्या प्रकरणात समन्स जारी केले आहेत. या विभागाने गेल्याकर्षी एअरलाइन्सच्या मुंबईस्थित कार्यालयात झडती घेतली होती आणि दस्तावेज सील केले होते.

जेट एअरवेज आणि त्यांच्या दुबईस्थित ग्रुप कंपन्या यांच्यात आयकर विभागाच्या तपास शाखेला कथितरीत्या अनियमितता आढळून आली होती. आयकर सूत्रांनी सांगितले की, 650 कोटी रुपयांचा कर बुडविण्याचा  त्यांचा हेतू होता. एअरलाइन्स दरवर्षी दुबईमध्ये आपल्या जनरल सेल्स एजंटला कमिशन देते, ते ग्रुप युनिटचाच एक भाग आहेत. आयकर कायद्यानुसार वैध व्यवहारांच्या तुलनेत ही देवाणघेवाण खूपच जास्त आहे.

जेट एअरवेजने आपला जून तिमाहीचा अहकाल जाहीर करण्यास उशीर केल्यावर हा सर्व्हे करण्यात आला होता. या संशयित देवाणघेकाणीचे स्पष्टीकरण देण्याबाबत गोयल यांना विचारणा करण्यात आली आहे. दरम्यान, जेट एअरवेजने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तथापि, काही दिवसांपूर्की जेटने स्पष्ट केले होते की, हे व्यवहार कायद्यानुसारच आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी व्यवहार मंत्रालयाने काही देवाणघेवाण संशयित असल्याचे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या