चांद्रयान-२ मध्ये चिखलीच्या नरेश गुरुदासानीचा खारीचा वाटा

180

राजेश देशमाने । बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या आदर्श विद्यालयाचा दहावीपर्यंतचा विद्यार्थी असलेला नरेश तुळशीराम गुरुदासानी यांनी चांद्रयान-२ मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

नरेश गुरुदासानी यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण चिखलीच्या आदर्श विद्यालयात पुर्ण केल्यानंतर एमटेक, प्रोडक्शन इंजिनिअरींग ही डिग्री मुंबई येथे पूर्ण करुन सध्या ते हैद्राबाद येथे इलेक्ट्रॉनिक मशिनरी पुरवठा करण्यार्‍या कंपनीत काम करीत आहे. त्यांनी काल आकाशात झेपावलेल्या चांद्रयान-२ मध्ये आपला खारीचा सहभाग नोंदवला आहे. नरेश हे सोलिड रॉकेट मोटर्सला इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी, एसएचएआर) साठी ३ एक्सिस सीएनसी वर्टिकल फेसिंग मिलच्या पुरवठा आणि कमी करण्याच्या प्रकल्पाचा भाग होते. हे २०० टन लोड क्षमतेची आणि ४८०० मिमी डायआ रोटरी टेबलसह विविध उपप्रणाली जसे उच्च वारंवारिता स्पिंडल, प्रेशरराइज्ड कंट्रोल रूम आणि प्रोपेलंट, इनबिबिशन आणि इन्सुलेशन मशीनिंगच्या विविध प्रकारच्या प्रकारच्या मशीनसाठी आवश्यक असलेल्या चिप आणि धूळ संग्रह यंत्रणा असलेली ही आर्ट मशीन आहे. सॉलिड रॉकेट मोटर्स एचएमटी मशीनचा वापर चंद्रयान २ च्या मशीनिंग घन मोटर्ससाठी केला गेला. ही यंत्रणा नोव्हेंबर २०१८ मध्ये इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांना देण्यात आली.

अवघा देश ज्याच्या भरारीकडे टक लावून पाहत होता ते चांद्रयान-२ सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांनी चंद्राकडे झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन जीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयानाला कवेत घेऊन अवकाशात झेप घेताच इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. भरारी घेतल्यानंतर अवघ्या १७ व्या मिनिटाला चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत दाखल झाले आणि इस्त्रोच्या संशोधकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या नरेश गुरुदासानीचा या अभियानात खारीचा वाटा हा जिल्ह्याचा मान उंचावणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या