पृथ्वीला ‘या’ धूमकेतूपासून मोठा धोका; नासाचा इशारा

1169

नोस्ट्रदेमस आणि बाबा वेन्गा यांच्यासह अनेक भविष्यवेत्त्यांनी पृथ्वीच्या विनाशाबाबातची भाकीते करून ठेवली आहेत. मात्र, सध्या अनेक भविष्यवेत्त्यांनी 2020 या वर्षाबाबत केलेल्या भाकितांची चर्चा होत आहे. या वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता भविष्यवेत्त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणामुळे काय संकटे येणार याची चर्चा होत आहे. शुक्रवारी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत आहे. या चंद्रग्रहणानंतर दोनच दिवसात पृथ्वीजवळून विशालकाय धूमकेतू जाणार असल्याने पृथ्वीला धोका असल्याचा इशारा नासाने दिला आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने अॅस्टेरॉइड ट्रकिंग सिस्टीमद्वारे पृथ्वीजवळून जाणाऱ्या 2020 एबी 2 या विशालकाय धूमकेतूबाबतची माहिती मिळवली आहे.

2020 एबी 2 हा विशालकाय धूमकेतू रविवारी 12 जानेवरीला पृथ्वीजवळून जाणार आहे. चंद्रग्रहणाचा प्रभाव 15 दिवस राहतो, असे मानण्यात येते. त्यामुळे या धूमकेतूचा संबंध चंद्रग्रहणाशी जोडण्यात येत आहे. हा धूमकेतू 18,440 प्रतितास या प्रंचड वेगात पृथ्वीच्या दिशेन प्रवास करत असल्याचे नासाने म्हटले आहे. या गतीने हा धूमकेतू लंडन ते न्यूयॉर्क शहरापर्यंतचे अंतर सहा मिनिटात पार करू शकतो. एसआर 71 ब्लॅकबर्ड या जगातील सर्वाधिक वेगवान विमानाला हा प्रवास करण्यास एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यावरूनच या धूमकेतूच्या प्रचंड गतीची कल्पना येते. या गतीने धूमकेतू पृथ्वीवर धडकल्यास पृथ्वीच्या मोठ्या भाग नष्ट होण्याची भीती आहे. तसेच एवढ्या वेगात धडकणाऱ्या धूमकेतूमुळे 185 फूट उंचीची त्सुनामी येऊ शकते, असेही नासाने म्हटले आहे. या धूमकेतूचा आकार 15 मीटर म्हणजे 49 फूट आहे. सध्या धूमकेतूची असलेली दिशा तिच राहीली तर पृथ्वीला धोका नाही. मात्र, जर धूमकेतूची दिशा बदलली तर पृथ्वीला धोका असल्याचा इशारा नासाने दिला आहे. सध्याचा धूमकेतूचा वेग आणि दिशा तिच राहिल्यास हा धूमकेतू पृथ्वीपासून 1,645,576 किलोमीटरवरून जाणार आहे. या चंद्रग्रहणापूर्वी पृथ्वीजवळून चार विशालकाय धूमकेतू गेले आहेत. या धूमकेतूंचा आकार 2020 एबी 2 पेक्षा मोठा होता.

आपली प्रतिक्रिया द्या