पृथ्वीच्या संरक्षणाकरिता नासाचे ‘डार्ट’ मिशन, उद्या सकाळी थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता…

आगामी काळात हवामान बदल म्हणजेच ग्लोबल वार्मिंगचा सर्वात मोठा धोका पृथ्वीला फक्त लघुग्रहांपासून होणार असल्याचे नासाचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात पृथ्वी लघुग्रहांच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहण्याकरिता आणि अशा प्रकारच्या आपत्तींना थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी नासाने डार्ट ( DART) मिशन तयार केले आहे.

उद्या, 27 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता या डार्ट मिशनद्वारे पृथ्वी भविष्यात लघुग्रहांच्या हल्ल्यापासून वाचेल की नाही हे ठरवण्यात येणार आहे. नासाचे DART मिशन डिडिमॉस आणि चंद्रासारखा दिसणारा दगड डिमॉर्फोसवर हल्ला करेल. DART मिशन म्हणजे दुहेरी लघुग्रह पुनर्निर्देशन चाचणी (Double Asteroid Redirection Test – DART) लघुग्रहाशी टक्कर देऊन अंतराळयानाची दिशा बदलणे हा या मिशनचा उद्देश आहे. नासाची ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारे धोकादायक लघुग्रह थांबतील किंवा त्यांची दिशा बदलली जाईल.

नासाचे डार्ट मिशन म्हणजे काय?
– डार्ट मिशन डिडिमॉस लघुग्रहाच्या चंद्र डिमॉर्फोसशी टक्कर देईल. त्यानंतर डिमॉर्फोस जाऊन डिडिमॉसशी टक्कर देईल. यामुळे डिडिमॉस आणि डिमॉर्फोस दोघांच्याही दिशेत बदल होईल. डार्ट मिशनद्वारे नासाने अवकाशात सोडलेले हे यान ताशी 24 हजार किलोमीटर वेगाने लघुग्रहावर धडकणार आहे.

– टक्कर होण्यापूर्वी, डिडिमॉस या लघुग्रहाचे वातावरण, माती, दगड आणि रचना यांचाही अभ्यास केला जाईल. या मिशनमध्ये कायनेटिक इम्पॅक्टर तंत्राचा वापर केला आहे. म्हणजेच अंतराळयानाशी टक्कर देऊन दिशा बदलण्याचा प्रयत्न या मिशनद्वारे केले जाणार आहेत.

– डिडिमॉसचा एकूण व्यास 2600 फूट आहे. डिमॉर्फोस त्याच्याभोवती फिरतो. त्याचा व्यास 525 फूट आहे. टक्कर झाल्यानंतर दोन्ही दगडांच्या दिशेत आणि वेगातील बदलांचाही अभ्यास केला जाणार आहे.

हा कार्यक्रम थेट कसा पाहाल?
हा कार्यक्रम तुम्हाला पाहायचा असेल, तर नासाच्या मिडिया चॅनलवर क्लिक करून कार्यक्रमाचे कव्हरेज पाहू शकता किंवा ‘NASA Television’ द्वारेही हा कार्यक्रम थेट पाहता येईल.