पाकिस्तान संघातून नसीम बाहेर

अखेर पाकिस्तानने आगामी  वर्ल्ड कपसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली आशिया कप स्पर्धेत खेळलेल्या दोन खेळाडूंना वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे भेदक गोलंदाज नसीम शाहला वगळण्यात आले असून त्याच्या जागी हसन अलीची निवड करण्यात आली आहे तर वेगवान गोलंदाज फहीम अश्रफच्या जागी फिरकीवीर उसामा मीरचा याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

5 ऑक्टोबरपासून हिंदुस्थानात सुरू होणाऱया वर्ल्ड कपसाठी बहुतांश देशांनी आपल्या संघाची घोषणा केली होती. आता त्यात पाकिस्तानचीही भर पडली आहे. आज  पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि मुख्य निवड समिती अध्यक्ष इंझमाम उल हक यांनी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा केली.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी संघातील खेळाडू अधिक सामने खेळले आहेत. त्या खेळाडूंनाच आम्ही संघात स्थान दिल्याचे हक यांनी सांगितले. आशिया चषक स्पर्धेमध्ये केवळ दोन सामने आम्ही खराब प्रदर्शन केले, मात्र विश्वचषक स्पर्धेमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा निश्चित केली पाहिजे. आमचे गोलंदाज मधल्या षटकांमध्ये फलंदाजांना बाद करू शकत नाहीत ही पाकिस्तानी संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र संघ व्यवस्थापन याकडे लक्ष देत आहे, असे इंझमाम यांनी सांगितले.

विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ ः बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, हसन अली आणि शाहिन आप्रैदी.

राखीव ः मोहम्मद हरिस, जमान खान, अबरार अहमद.