पीक नुकसानीबाबत मदतीचा प्रस्ताव, 6 लाख 34,368 शेतकरी बाधित

468

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा 588 कोटी 91 लाख 87 हजार 932 रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांनी शासनाला पाठवला आहे. पीक नुकसानीच्या आकडेवारीत काही हेक्टर क्षेत्र अहवालात नमूद करण्यात आलेले नसल्याने जिल्ह्यासाठी मागण्यात येणाऱ्या मदतीच्या आकड्यांमध्ये वाढ होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात जिल्ह्यातील 7 लाख 3 हजार 787 हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळपिकांचे 33 टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये 6 लाख 34 हजार 368 शेतकरी बाधित झाल्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल मदत व पुनर्वसन सचिवांना पाठवण्यात आला आहे. त्यानुसार जिरायती पिकाखालील 5 लाख 46 हजार 161.57 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांवर नुकसान झाले असून, 4 लाख 90 हजार 889 शेतकरी नुकसानीने बाधित झालेले आहेत.

जिरायतीचे पीकनिहाय झालेले 33 टक्क्यांवर नुकसान –

सोयाबीन 22575.95 हेक्टर, बाजरी 10519.90, कापूस 360678.14, तूर 4914.96, मूग 1358.71, उडिद 5267.2, ज्कारी 61307.48, मका 77345.73, तीळ 303.10, भुईमूग 749.8 क इतर 1045.31.

तालुकानिहाय पिकांचे हेक्टरी झालेले नुकसान
जळगाव 51 हजार 500 हेक्टर, भुसावळ 25052.16, बोदवड 2 हजार 727.97, यावल 41 हजार 85.32, रावेर 25 हजार 304, मुक्ताईनगर 29 हजार 147.25, अमळनेर 41 हजार 410.5, चोपडा 57 हजार 882, एरंडोल 36 हजार 880.9, धरणगाव 38 हजार 441.59, पारोळा 53 हजार 329.3, चाळीसगाव 83 हजार 396.87, जामनेर 98 हजार 252.71, पाचोरा 59 हजार 518.45 व भडगाव 37 हजार 57.86 हेक्टर.

बागायती पिकांचे 33 टक्क्यांकर झालेले नुकसान
जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 27 हजार 523.7 हेक्टरवरील बागायती कपाशीचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे कांदा, ज्वारी, काकडी, मिरची, मका, भाजीपाला, केळी व इतर पिके असे एकूण 1 लाख 47 हजार 104.98 हेक्टर पिकांचे 33 टक्क्यांवर नुकसान झाले.

त्यामुळे 1 लाख 32 हजार 896 शेतकरी बाधित झाले आहेत. तर 10 हजार 520.67 हेक्टरवरील केळी, डाळिंब, लिंबू, सीताफळ, मोसंबी, चिकू, आंबा, पपई आदी फळपिकांचे 33 टक्क्यांवर नुकसान झाले असून, तब्बल 10 हजार 583 शेतकरी बाधित झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या