नाशिक : नोकरी, कर्जाच्या नावाखाली, दहा जणांची फसवणूक

636

एका महिलेला नोकरी, तर इतरांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून भामटय़ाने दहाजणांचे 2 लाख 83 हजार 350 रूपये हडप केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने अशा प्रकारे राज्यभरात अनेकांना फसवल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पी. बी. बाकले यांनी दिली.

माऊली लॉन्सजवळील रानु पाटील ही महिला नोकरीच्या शोधात होती. पंधरा फेब्रुवारी रोजी तिने वर्क इंडिया या संकेतस्थळाद्वारे अंधेरी येथील अनिल वजीरानीशी संपर्क साधला. त्याने पाटील यांना ग्लोबल ट्रस्ट सर्विसेसमध्ये नोकरी लावून दिल्याचे भासवून त्याबदल्यात 68 हजार रुपये घेतले. त्यानुसार प्रोसेसिंग फी व आगाऊ कर्ज हप्त्याच्या नावाखाली वजीरानीने अनेकांकडून वेळोवेळी आरटीजीएस, फोन पे, गुगल पेद्वारे दोन लाख रुपये घेतले. मात्र, दीड महिना होऊनही कर्ज वाटप केले नाही, तसेच आजपर्यंत पैसेही परत दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात रानु पाटील यांनी शनिवारी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून वजीरानीविरुद्ध फिर्याद दिली.

आपली प्रतिक्रिया द्या