नाशकात आईसक्रीम खाल्ल्याने ५० मुलांना विषबाधा

56

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिक जिल्ह्यातील नामपूरच्या बहिरावणे आणि आसपासच्या दोन गावात आईसक्रीम खाल्याने जवळपास ५० मुलांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या मुलांना उपचारासाठी नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही मोठ्या लोकांना देखील विषबाधा झाली आहे.

राज्यभरात उन्हाची तीव्रता सध्या वाढत आहे, त्यामुळे गावागावात कुल्फीवाले येतात. अशाच प्रकारचा आईसक्रीमवाल्यांची आईसक्रीम खाल्लांना येथील मुलांना ही विषबाधा झाली आहे. मुलांना उलटी आणि जुलाब होण्यास सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या मुलांना नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास नामपूर पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या