नाशिक – शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून उडी घेऊन सराफाची आत्महत्या

571

हैद्राबाद पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या नाशिकच्या पेठरोड येथील सराफ व्यावसायिकाने मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून उडी घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पेठरोड येथील विजय बिरारी असे या सराफाचे नाव आहे. हैद्राबाद येथे घरफोडी केल्यानंतर चोरट्यांनी ते सोने महाराष्ट्रातील सराफी व्यावसायिकाला विकल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली होती. त्याच गुन्ह्याच्या तपासासाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या हैद्राबाद पोलिसांनी बिरारी यांना ताब्यात घेवून शासकीय विश्रामगृहात आणले. चौकशी सुरू असतानाच मंगळवारी दुपारी चौथ्या मजल्यावरील कक्षातून बिरारी यांनी उडी मारली. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या