नाशिक : होम क्वारंटाईन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासह मुलाला शेजाऱ्यांकडून मारहाण

1237
fight
file photo

सिडकोतील महाले फार्म येथे होम क्वारंटाईन असलेल्या कोरोनाबाधित व्यक्ती व त्यांच्या मुलाला शेजारील कुटुंबाने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

सिडकोतील महाले फार्म येथे राहणारे एक जण मुंबईत नोकरी करतात. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्यामुळे घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. गुरुवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास ते व त्यांचा मुलगा घराबाहेर दिसले. शेजारी राहणाऱ्या अप्पा मोतीराम बच्छाव यांनी पवार यांना तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, मग येथे कसे राहतात, असा जाब विचारला. यावरून झालेल्या वादावादीत बच्छाव, त्यांची दोन मुले, पत्नी, सुना यांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बच्छाव यांचा मुलगा निशांतने फरशीचा तुकडा मारल्याने मुलगा जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या