नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस ऍकॅडमीतील 167 जणांना कोरोना

प्रातिनिधिक फोटो

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस ऍकॅडमीतील 167 प्रशिक्षणार्थींना कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. यातील 130 जणांवर ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरितांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले आहे. महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

महाराष्ट्र पोलीस ऍकॅडमीमध्ये सध्या सुमारे 700 प्रशिक्षणार्थी आहेत. अधिकारी व कर्मचारी असे मिळून सुमारे 1400 जण या ठिकाणी वास्तव्याला आहेत. अनलॉकनंतर गेल्या काही दिवसांत एक-दोन जण बाहेरगावी जाऊन परत आले होते. 16 डिसेंबराला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर पुढील आठवडाभरात 167 प्रशिक्षणार्थींना कोरोनाची लागण झाली.

आपली प्रतिक्रिया द्या