पोलीस भरतीत उंचीसाठी खटा‘टोप’

145

नाशिक – नाशिक येथे पोलीस शिपाई भरतीत शारीरिक उंचीत पात्र होण्यासाठी त्र्यंबकेश्वरजवळील अंबोली येथील राहुल किसन पाटील या तरुणाने डोक्यावर नकली केसांचा टोप वापरल्याचे उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर गेल्या चार दिवसांपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. आपली उंची १६५ सेंटीमीटरच्या वर भरावी, यासाठी राहुल किसन पाटील या तरुणाने नकली केसांचा टोप लावून शारीरिक चाचणी दिली. त्याची उंची मोजण्यात येऊन त्याला त्यात पात्र ठरविण्यात आले, याचवेळी एका हवालदाराला शंका आली. त्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली, डोक्यावरील टोप काढून पर्दाफाश करण्यात आला. उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुभाष कुडके यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी या तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या