‘या’ जबरदस्त कामगिरीमुळे नाशिक पोलिसांची राज्यात चर्चा, कौतुकाचा वर्षाव

25704

सध्या नाशिक शहरातच काय तर राज्यात चर्चा सुरू आहे ती नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांची. शिवाजीवाडी भारतनगर येथील एका गर्भवती महिलेला मध्यरात्री प्रसुती कळा येऊ लागल्याने नाशिकच्या मुंबईनाका पोलिसांनी योग्य त्या हालचाली करून तिला रुग्णालयात दाखल केले. या महिलेने बाळाला जन्म दिला असून बाळ आणि आई दोघेही सुखरूप असल्याचे माहिती देण्यात आली आहे.

मुंबई नाका पोलिसांच्या कामगिरीवर खुश होऊन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले असून उपायुक्त अमोल तांबे यांनी दोन हजार रुपयाचे बक्षीस ड्युटीवर असलेल्या पोलिसांना जाहीर केले आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक सारे नाशिककर करत आहेत.

मुंबई नाका पोलीस शिवाजी वाडी भारतनगर येथे एका महिलेला मध्यरात्री प्रसुती कळा सुरू झाल्या. कुटुंबीयांनी 108 नंबर वर कॉल करून मदत मागितली. मात्र ऍम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान याच वेळी विनयनगर येथील बीट मार्शलवर पोलीस हवालदार संजय लोंढे आत्तार गस्तीवर होते. त्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी मुंबई नाका मोबाईलची मदत मागितली. स्थितीचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे हवालदार शिंदे आणि गुंजाळ यांनी तातडीने मदत पाठवली आणि व्हॅनमधून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच महिला प्रसूती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप सुखरूप आहेत. अशा कठीण प्रसंगात पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या