प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदवड तालुक्यातील निमोण येथे सोमवारी प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. निमोणच्या आदिवासी वस्तीवर शेजारी राहणारे पूजा मारुती पिंपळे (16) व सुखदेव दिलीप सोनवणे (18) यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने पिंपळे यांनी त्यांचे लग्न करून देण्यास नकार दिला. याच कारणाने सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास पिंपळे यांच्या स्वयंपाकघरात छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मारुती निवृत्ती पिंपळे यांनी चांदवड पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून, पोलीस नाईक एच. जे. पालवी पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या