नाशिक शहरात सोमवारी 11 अकस्मात मृत्यू, वाढते प्रमाण धक्कादायक

निरनिराळ्या कारणांनी अस्वस्थ वाटू लागल्याने काल सोमवारी 11 जणांनी आपले प्राण गमावले. कोरोनाच्या संकट काळातील अकस्मात मृत्यूचे हे वाढते प्रमाण धक्कादायक आहे.

घरात चक्कर येऊन, श्वास घेण्यास त्रास होऊन कामगारनगरच्या आशाबाई अर्जुन बनसोडे (55), गोविंदनगरच्या सुरेखा राजेंद्र केंद्रे (58), कामटवाडे येथील सुधाकर विठ्ठलराव जठार (70), नाशिकरोडच्या खर्जुल मळा येथील विलास कारभारी बारगळ (52), पेठरोडच्या विमलबाई धर्मराज महाले (79) व शिवाजीनगरच्या वात्साबाई सुदाम नरवडे (81) यांचा सोमवारी मृत्यू झाला.

छातीत दुखून अस्वस्थ वाटू लागल्याने अंबडचे सिकंदर साहेब सय्यद (60), नाशिकरोडच्या लोखंडे मळा येथील कचरू वाळू माळी (78) व अशोका मार्गचे रमेश राधाकिसन चन्ना (66) दगावले. गंजमाळच्या ज्योखती संजय गायकवाड (43) यांना दुपारी पोटात दुखत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात रविवारी संध्याकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनोळखी व्यक्ती दाखल झाली होती. काल दुपारी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या